धर्म, धर्मनिरपेक्षता, आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न – १
आणखी काही दिवसांनी आम्हाला मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावयाचे आहे. मागच्या निवडणुकीमध्ये विविध पक्षांचे जे बलाबल होते त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय अस्थैर्य हा आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये फार मोठा अडथळा आहे हे कोणालाही मान्य होईल. ह्या वेळच्या ह्या राजकीय अस्थैर्याचे मूळ अलीकडे वाढलेल्या धर्माभिमानामध्ये आणि धर्माच्या आधारावर स्वतःला अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक …